27 April 2021

आंबा परेड 😂😂😂

Edit Posted by with No comments
वंश परंपरेने आंबा प्रेम पर्णवी कडे पण आहे.आंबा हवा बस्स बाकी काही नको.पापड-आमरस,भात-आमरस,चपाती-आमरस,आमरस करताना राहिलेली कोय अन आंब्याचं साल, किंवा फोडी करून आंबा खाताना कोय अन साल एकदम चकाचक करणे हे असं आंबा प्रेम आहे.मागच्या आठवड्यात दुपारी जेवण झाल्यावर आंबे खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला.आजोबा अन पर्णवी यांच्या मध्ये फोडी कोणी खायच्या अन कोय कोणी खायची याचा करार झालेला आहे.खर तर दोघांचे अशे बऱ्याच...

24 April 2021

घात विश्वासघात 😂😄🤣

Edit Posted by with No comments
चिकू ची आजोबांच्या सोबत भन्नाट connection आहे.सकाळी उठल्या बरोबर जे आजोबांसोबत मस्ती सुरू होते ते थेट रात्री उशिरापर्यंत.आजोबां सोबत गोष्टी, क्रिकेटच्या मॅच अन ऐतिहासिक मालिका अस सगळं फुल ऑन दोघांचं मेतकूट जमलेलं असतं.संध्याकाळी स्वामींची मालिका, घेतला वसा ,बाळू मामा वगैरे मूड असेल बघणं सुरु असतं.यादरम्यान त्यांच्या गप्पा म्हणजे एक वेगळाच प्रकार आहे.त्यात मूड असेल तसं आजोबांना वेग वेगळी नावाने हाका...

23 April 2021

जिंदगी गुलजार है

Edit Posted by with No comments
बरेच दिवस झाले डायरी मध्ये आठवणीचा खजाना भरून ओसंडतो आहे पण लिहायला काही मुहूर्त लागत नाहीये.मागे एका पोस्ट मध्ये लिहलं आहे त्याप्रमाणे करोना मध्ये माझ्यासाठी सर्वात चांगली झालेली गोष्ट म्हणजे पर्णवी सोबत मिळालेला वेळ... जरी ऑफिसची भरपूर काम असली तरी ती सततची लुडबुड किंवा एखाद्या मिटिंग वेळी मध्येच येऊन डिस्टर्ब करणं किंवा हळूच चिमटा काढणं आ काही ना काही सुरूच असतं. डायरी ची पान सर सर पुढे जात आहेत,पिल्लू...