27 July 2022

पसारा पुराण !!

Edit Posted by with No comments
घराचा असा एकही कोपरा नाही की जिथे पर्णवी मातेने आपल्या अस्तित्वाची खूण सोडली नाही.पर्णवी शाळेत जाते तेव्हा त्या वेळात घर मोकळा श्वास घेत. अन त्या वेळात घर अगदी गरीब होऊन जातं.सार काही जागेवर,कुठेही काहीच अस्ताव्यस्त नाही.यादरम्यान घराला जी काही गरिबी येते ती पर्णवी च आगमन होताच चुटकीसरशी गायब होते अन घर गर्भश्रीमंत होतं. हॉल,किचन ,बेडरूम, गॅलरी ,ड्रेसिंग टेबल ,सोफा इ इ ठिकाणी लाथ मारेल तिथे पाणी काढेल...