07 August 2022

परतावा !!

Edit Posted by with No comments
 आपण सांगितलेली एखादी शिकवण कधी अन कोणत्या वेळी आपल्यावरच परतवली जाईल याचा काही नेम नसतो. याचा आता खूप चांगला अनुभव गाठीशी आलाय. असंच काहीसं आज झालं. आज दुपारी माझं अक्षरधारा ला जायचं ठरलं होतं . मी अन सुजाता याबद्दल बोलत होतो, मी एकटाच कुठे तरी जातोय अशी कुणकुण लागताच लगेच छोटं हायकमांड ने लगेच प्रश्नावली सुरु केली.. " बाबा...कुठे जातो आहेस रे ?"" मी गावात जातोय ..." [मला जेव्हा सिटी मध्ये...