02 October 2021

डॉक्टर!!

Edit Posted by with No comments
पर्णवी ची डेंटिस्ट ची अपॉइंटमेंट होती म्हणून आम्ही निघालो होतो.डेंटिस्ट अन तिचे आयुर्वेदिक डॉक्टर एकाच ठिकाणी आहेत.अन आयुर्वेदिक डॉक्टरांसोबत तिचं मोठं असं गप्पाष्टक असतं. मागील वेळी गेलो होतो तेव्हा पर्णवी एकटीच होती यावेळी मात्र अद्वय पण सोबत होता.तस अद्वय पेक्षा पर्णवी फक्त सहा महिन्यांनीच मोठी आहे पण संधी मिळताच ताईगिरीची एक पण संधी सोडत नाही.यावेळी पण असंच झालं.मागील वेळेस पर्णवी एकदा जाउन आली...

01 October 2021

पोस्टमन !!

Edit Posted by with No comments
करोना मुळे यावर्षी सुद्धा आई ला रक्षाबंधन साठी मामा कडे  गावी जाणं शक्य होणार नव्हतं त्यामुळे आपण राख्या पोस्टाने पाठवून देऊ असं ठरलं. सध्याच्या डिजिटल गोष्टींमुळे पोस्ट,पत्र ,तार इ.इ. जी जुनी संपर्क संसाधने आहेत ही या नव्या पिढीला काही माहित नाहीत. पर्णवी ला पोस्ट ऑफिस , पत्र , पोस्टमन याबद्दल सांगितलं होत. चार दिवस अगोदर  राखी पाठवून पण मामा ला रक्षाबंधन ला राखी काही मिळाली नाही....