05 January 2022

स्वामी आजोबा !!

Edit Posted by with 2 comments
पर्णवीला अजाणतेपणा पासून स्वामींचे आकर्षण आहे.लहानपणी झोपताना स्वामींचा जप असो किंवा तारकमंत्र लावला की अगदी तल्लीन होऊन ऐकायची. मग जसजशी मोठी होत गेली तशी स्वामी आजोबा तिचे फ्रेंड झाले.त्यांच्या सोबत गप्पा मारते ,आमचं काही चुकलं की स्वामींना तक्रार करते.तिच्या कडून चुकीचे वागलं गेलं किंवा बोललं गेलं की लगेच स्वामींच्या समोर जाऊन चूक कबूल करते.

स्वामींची मालिका सुरू झाल्यापासून तर मग खूप सारे प्रश्न पडतात,काही प्रश्न तर असे असतात की त्याची उत्तर आम्हाला माहीत नसतात मग अशा वेळी आमचे गुरुमाऊली अन तिचे विजय काका म्हणजे हक्काचं माणूस,त्यांना फोन करून प्रश्न विचारायचं. 

सातारा जवळ बोरणे ला आमचा स्वामींचा मठ आहे.शक्य होईल तेव्हा आम्ही तिथे मठात सेवेसाठी किंवा पायी अक्कलकोट वारीला जात असतो.एकदा तर जाताना संपूर्ण प्रवासात स्वामींच्या मालिकेचं गाणं आमच्या कडून म्हणून घेतलं होतं..त्यात पण स्वामी आजोबांचं गाणं आहे नीट म्हणायच,थोडा उच्चार चुकला तरी परत म्हणायला लावलं 🤣😂

तर एकंदरीत अस हे सारं स्वामी प्रेम आहे.काल सुजाता अन ती अशा दोघींच्या गप्पा सुरु होत्या तर अचानक म्हणे..

"आई ,तुला सांगू का आपण कोणीच स्वामींना "स्वामी" किंवा "श्री स्वामी समर्थ " अस काही म्हणायला नको..."

"हो का....का ग...अस का बरं...."

"अग आई...ते आपल्या सर्वांपेक्षा किती मोठे आहेत...अन आपण किती लहान आहोत..."

"अस होय...."

"त्यांचे  गुरू च त्यांना फक्त स्वामी म्हणणार कारण ते त्यांच्या पेक्षा मोठे असणार ना..."

"बर मग आपण काय म्हणायचं ?"

"आपण ना  स्वामी आजोबा असंच म्हणायचं...."🥰

2 comments:

  1. शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!
    मुखी अमृताची वाणी ! देह देवाचे कारणी !!
    तुकाराम महाराज म्हनतात की,बीज( बियाणे )जर शुद्ध असेल,कसदार,संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही गोमटी म्हनजे चांगलीच येणार.आणि ती फळे रसाळ आणि गोडच असणार.जर बीज किडके असेल कमकुवत असेल तर त्या बिजापासुन बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही सुद्धा कमकुवतच निपजतात.या बिजाप्रमाणेच जर माणुस संस्कारी असेल.निर्व्यसनी,पुण्यवान,शिलवान,चारिञ्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्मणारी संततीही गोमटी आणि शिलवान,चारिञ्यवान,संस्कारी निपजेल.त्यामुळे माणसाच्या मुखात नेहमी अमृताची वाणी असावी.
    योगेश दादा मुळातच तुमचा परिवार स्वामी भक्तीत रममाण असल्याने पर्णवीत सुध्दा स्वामी भक्तीची आवड निर्माण झाली आहे. धन्य आहे तुमची भक्ती. जय हो.

    ReplyDelete
  2. श्री स्वामी समर्थ ।

    ReplyDelete