बाप झाल्या पासून मला आई पणा बद्दल आतून एक सुप्त अशी असूया वाटू लागली आहे.लेकरांसोबत त्यांची आतून एक जन्मजात घट्ट अशी वीण असते.कदाचित ते 9 महिने अन त्या अशक्यप्राय अशा वेदना याचा बोनस असावा.पर्णवी सोबत सुजाता ला जेवढा वेळ घालवता येतो तितकासा मात्र मला शक्य होत नाही ही सल किंवा आपण खूप काही मिस करतोय ही टोचणी अदृश्य रूपाने नेहमीच पाठलाग करत असते.
सुरूवातीच्या काळात सकाळी पर्णवी ला सोडून ऑफिस ला जायचं...
16 June 2019
15 June 2019
मेकअप !!
Edit Posted by Yogesh with No commentsशनिवारी दुपारची निवांत वेळ....दुपारचं जेवण करून विकांताच्या पेंडिंग कामाची लिस्ट पाहत....चला आता कोणत काम उरकायचं असा साधा सरळ विचार करत तुम्ही पुढचं सगळं नियोजन ठरवून टाकता....पण त्याच वेळी नियतीच्या मनात काही तरी वेगळंच सुरू असत....भविष्यात काय लिहलं आहे याची तुम्हाला जाणीव ही नसते...अन अशा वेळी तुम्ही सहजच बेडरूम मध्ये डोकावता....त्याच क्षणी तुमचा घात होतो...
"बाबू.....आलास....इकडं ये ना....आता...
14 June 2019
भूक
Edit Posted by Yogesh with No comments"बाबू....मला भूक लागली आहे...काही तरी खायला दे...."
"बरं....काय देऊ??...पोळी भाजी देऊ का "
"नको....."
"मग...डाळू भातु खाणार का...."
"नको..."
"भेळ खाणार का..."
"नको...."
"केळी...."
"नको..."
"खजूर...."
"नको..."
"भेळ....चिवडा....बिस्कीट....कलिंगड.... " अस एक ना अनेक बरेच option देऊन झाले पण प्रत्येकाला नकारघंटा...
शेवटी वैतागून विचारलं...."बच्चा....तुला नक्की भूक लागली आहे ना?"
"हो रे बाबू...भूक लागली...
Subscribe to:
Posts (Atom)