16 November 2019

मला सहन होत नाही!!

Edit Posted by with No comments
दोनेक आठवड्यापूर्वी विकांताला आज नाश्ताला घरी नको बनवायला बाहेरून काही तरी आणू अस सुजाताचं अन माझं बोलणं सुरू होतं.बाहेरून नाश्ता म्हणलं की डोसा हा चिकूचा पर्यायाने आमचा फिक्स आयटम असतो.
बाबांना काय हवंय म्हणुन मी त्यांना विचारत होत. तर बाबा म्हणाले मला नको काही आणू...बाहेरचं मला काही सहन होत नाही...बाहेरच्या खाण्याचा मला त्रास होतो त्यामुळे तुमच्या पुरतं आणा. बाजूलाच पर्णवी पण होती...बाबा नको म्हणाल्यावर लगेच इमोशनल ब्लॅकमेल सुरू आजोबी अस करणार ना तुम्ही? थोडंस खा की....अगदी छोटू...जास्त नको...वगैरे...वगैरे...
शेवटी मीच म्हणालो "चिकू...नको बच्चा...आजोबांना सहन होत नाही त्यामुळे आग्रह नको करू."
आता हे अगदी नेहमी सारखंच आपलं बोलणं पण हे आपल्या साठी....हे बोलणं भविष्यात आपल्याला अंगलट येऊ शकत याची अस्मादिकांना यत्किंचितही कल्पना नव्हती.
त्यांनतर मग साधारण आठेक दिवसांनी रात्री आम्ही जेवण करत होतो.पर्णवी ने संध्याकाळी थोडं फार खाल्लं होत त्यामुळे तिला काही भूक नव्हती. पण रात्री भूक लागेल म्हणून बाबा तिला म्हणाले..."पर्णवी....तस झोपू नको...थोडंस डाळ भात खा"
तर यावर लगेच प्रत्युत्तर आलं..."नको आजोबा...मला सहन होत नाही.." हे ऐकल्यावर आम्ही ओळखलं काही तरी गडबड आहे 😂😂😂
मग मी म्हणालो..." काय...सहन होत नाही म्हणजे?"
तर मानेला झटका देत एवढं पण याला समजत नाही असा तिरकस कटाक्ष टाकत म्हणे..."अरे बाबू...आजोबांना कसं बाहेरचं म्हणजे डोसा,पावभाजी,वडा पाव सहन होत नाही नं तसच मला डाळ भात अन पोळी भाजी सहन होत नाही" 😂😂🤣🤣🤣

0 Comments:

Post a Comment