21 November 2019

वाढीव !!

Edit Posted by with No comments

सध्या पर्णवी ला सकाळी शाळेत सोडावं लागतं.जाताना मग आमचं रोज गप्पाष्टक सुरू असत.रोज नवीन काहीतरी विषय असतो.

आज सकाळी आम्ही जात होतो तेव्हा गप्पा सुरू असताना पर्णवी ने अचानक विचारलं....

"बाबू...रस्ता कशासाठी असतो?"

मी आपलं अगदी सिरीयस होऊन...सोपं करून सांगू लागलो

"रस्ता आपल्याला ये जा करण्यासाठी असतो...म्हणजे बघ आता आपल्याला घरापासून स्कुल ला जायचं आहे...कस जाणार? त्यासाठी रस्ता हवा..."

"अच्छा ...मग स्कुल कशासाठी असते?"

"स्कुल आपल्याला शिकण्यासाठी असतं"

"अच्छा...."
असंच मग अजून हे कशासाठी ,ते कशासाठी अश्या दोन तीन गोष्टी विचारल्या तेव्हा मग लक्षात आलं मातेच्या डोक्यात काही तरी खिचडी पकते आहे.अन असा विचार करे पर्यंत लगेचच गुगली आलाच.

"बाबू...मग आता सांग आईस्क्रीम कशासाठी असते?"

मी म्हणलं..."खाण्यासाठी..."

"हो की नाही...अरे बाबू ...आपण तर किती दिवस झाले आईस्क्रीम च खाल्लं नाही."

मग माझ्या लक्षात आता पर्यंत ची खिचडी का पकवली होती ते 😉

हम भी कुछ कम नहीं....यावर शक्य तितकं निर्विकार राहून कोणतीच प्रतिक्रिया नाही दिली...अन अगदी नकळत विषय गणपती बाप्पा वर नेऊन टेकवला 😂😂😂

शेवटी #बाप_है_हम

0 Comments:

Post a Comment