19 March 2022

निबंध - माझे गुरू☺️

Edit Posted by with No comments
पर्णवी ला इंग्रजी लिहण्याचा सराव व्हावा म्हणून रोज तिला चार पाच ओळी आम्ही लिहायला सांगतो.एक दोन आठवड्या पासून रोज शुद्ध लेखन लिहायच अशी group activity सुरू केली होती मग त्यात भाषेचं बंधन अस काही नाही.दोनेक दिवसांपूर्वी पर्णवी ने स्वतःच्या मनाने माझे गुरू असा लहानसा निबंध लिहलाय.मराठी...

13 March 2022

कोल्ड कॉफी 😃

Edit Posted by with No comments
विकांताला मला सकाळीच कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून मी माझं पटकन आवरून तयार होतो.निघणार तोच पिल्लू बागडत आलं अन अगदी केविलवाणा भाव घेऊन म्हणे.."बाबा...तू बाहेर जातो आहेस काय..."म्हणलं ..."हो पिलू...मला थोड्या वेळाच काम आहे एक दोन तासात येईल लगेच..."माझं बोलणं पूर्ण होण्या आधीच लगेच समोरून प्रत्युत्तर आलं..."थोडंच काम आहे तर मी पण येऊ का...चालेल ना..."नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता किंवा तो पर्याय...

12 March 2022

खायची गोष्ट आहे का...😉

Edit Posted by with No comments
संध्याकाळी मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो तेव्हा ट्रॅफिक मध्ये अडकून राहिलो त्यामुळे यायला उशीर झाला होता.रात्रीच्या जेवणात थालीपीठ चा बेत होता.थालीपीठ अन शेजवान चटणी हा पर्णवी चा एकदम आवडता प्रकार आहे.नेमकं शेजवान चटणी संपलेली मला यायला उशीर मग आता दुकानात कोण जाणार यावरून माय लेकी मध्ये झालेली फटकेबाजी खालील प्रमाणे....पर्णवी- आई, मी जाते ना एकटी दुकानात अन घेऊन येते चटणी.सुजाता- पिलू....तू लहान...

10 March 2022

आता काय...😃

Edit Posted by with No comments
वेळ : रात्री 11.30 चीस्थळ : बेडरूमपात्र : आई , बाबा अन पर्णवीदुपारी मस्त पैकी झोप झाल्यामुळे रात्री 11 नंतर मग पर्णवी च्या  दिवसाची सुरुवात झाली होती.माझं ऑफीसच काम पण जवळपास संपत आलं होत त्यामुळे माझी आपली आवराआवर चालली होती. अन सोबतीला पर्णवी चा दंगा सुरू होता.मी माझं आपलं आवरत होतो पण नियमानुसार बेड च्या एकूण एक कोपऱ्यात पर्णवी ची खेळणी, वह्या ,पुस्तके असा मजबूत पसारा पडला होता.शाळेची बॅग...