पर्णवी- आई, मी जाते ना एकटी दुकानात अन घेऊन येते चटणी.
सुजाता- पिलू....तू लहान आहेस अजून अन आता अंधार पण पडला आहे...मी बाबा ला सांगते तो घेऊन येईल
पर्णवी- आई...तुला ना मला लहान च ठेवायचं आहे...मी 11 years ची झाली किंवा 13 years ची झाली तरी तू असंच म्हणणार आहेस
सुजाता : अग पण रात्री गाड्या वेगात असतात...तुला अंधारात लक्षात नाही येणार.
पर्णवी - आई तुला माहीत आहे का टीचर ने आम्हाला स्कुल मध्ये रस्ता कसा क्रॉस करायचा हे शिकवलं आहे.अन शाळेत काय असंच उगाचंच शिकवतात का? अन मी 4 years ची होती तेव्हा गेली होती की नाही एकटी?
सुजाता - हो...तू गेली होतीस पण तेव्हा बाबा गुपचूप तुझ्या पाठीमागे आला होता.
पर्णवी - आई, तू फक्त 10 रुपयाचं coin नेऊ की नोट नेऊ एवढंच सांग...मी काही आता लहान नाही... मी एकटी जाऊन घेऊन येऊ शकते
सुजाता - नाय रे पिल्लू....अजून तू लहान च आहेस त्यामुळे अंधारात एकटी नको जाऊ बरं
पर्णवी- आई ....आता मी 7 years ची झाली आहे ...अन 7 years म्हणजे काही लहान नाहीये....मी मोठी च झाली आहे....7 years च होणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही...समजलं ना 😂😂🤣🤣🤣
अखेरीस मोठ्ठं झालेल्या माणसाने फोन करून बाबा लाच चटणी आणायला लावली 😁😃
0 Comments:
Post a Comment