22 February 2019

शुद्ध मराठी !!

Edit Posted by with No comments
मला 12-13 वर्ष पुण्यात राहून पण बोलण्यात असणारा गावाकडचा लहेजा काही बदललेला नाही.बोलण्यात तो पुणेरी पणा अजून काही आत्मसात झाला नाही. तर त्याच झालं अस...दोन आठवड्यापूर्वी पर्णवी ला डान्स प्रॅक्टिस नंतर घरी घेऊन येत होतो.येताना डोसा खायचा हट्ट झाला म्हणून मग शाळेजवळ असलेल्या हॉटेल मध्ये आम्ही गेलो. ऑर्डर  यायला वेळ होता त्यामुळे आमची मस्ती चालू होती.पर्णवी ला चांगलीच भूक लागली होती त्यामुळे केव्हा...

13 February 2019

वैताग!!

Edit Posted by with No comments
आमच्या कडे प्रत्येक गोष्टीसाठी एक एकेचा टर्न ठरलेला असतो.अर्थात अंतिम निर्णय हा पर्णवीचाच असतो.जेवण,आंघोळ,ब्रश इ इ साठी तिचा मूड असेल त्याप्रमाणे मग कधी आजी,आजोबा,आत्तू असेल तर आत्तू ,सुजाता किंवा मग मी.कोणाचा टर्न ठरवून अस काही नाही. बहुतांश वेळा शनिवार अन रविवार आंघोळीची जबाबदारी ही अस्मादिकांवर असते.आंघोळ कसली फक्त दंगा असतो..नक्की कोण कोणाला आंघोळ घालतय हे काही कळायला मार्ग नसतो...बाबू ..किती...

11 February 2019

गोष्ट

Edit Posted by with No comments
पर्णवी त्रास द्यायला लागली किंवा हट्ट करायला लागली की त्यापासून distract करायचं असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे गोष्ट सांगणं. गोष्ट सांगतो म्हणालं की स्वारी एकदम खूष होऊन जाते. पण केव्हा केव्हा या गोष्टींचा संदर्भ जेव्हा रोजच्या आयुष्यात यायला लागला की मग त्यातून येणारे निरागस प्रश्न हे खूपदा निरुत्तर करतात. खूप दिवसांपूर्वी सुजाता ने पर्णवीला बाप्पा ने सर्व प्राण्यांना कोण कोणते रंग कसे दिले याची...

10 February 2019

अस करतात का?

Edit Posted by with No comments
रात्री आम्ही सर्व जेवायला बसलो तेव्हा श्लोक म्हणून झाला अन जेवायला सुरुवात करायची तर पर्णवी अचानक उठली अन ठमी ला सोबत घेऊन तिच्याशी खेळायला लागली.[ठमी आमच्या बाहुलीच नाव आहे.] हे पाहून मग तिला जरा रागावल्या सारखं बोललो अन म्हणालो...."शहाणा माझा बच्चा ...चल पटकन जेवण करून घे' यावर अगदी शून्य मिनिटात आलेली प्रतिक्रिया..." बाबा मला तुझं हेच आवडत नाही....एकदा चांगला बोलतो अन जरा वेळात लगेच मला रागावतो....अस...

08 February 2019

ओ टकलू !!

Edit Posted by with No comments
पर्णवी सोबत दंगा करताना खूपदा मी आवाज बदलून तिला चिडवतो.अन परत मग तिला विचारतो कोण त्रास देतंय रे? हे अस खूपदा चालू असत. गाडीवर असताना किंवा रस्त्याने चालताना आमचे हे असले उद्योग सुरू असतात. एके शनिवारी सकाळी पर्णवी अन मी फिरायला निघालो होतो...सोसायटीच्या गेटवर आम्ही आलो तेव्हा आमच्या बाजूने एक काका मोबाईल वर बोलत चालले होते.अचानक तेव्हा पर्णवीला लहर आली माहित नाही. दोन्ही हात तोंडावर ठेवून आवाज...