25 March 2019

पसारा!!

Edit Posted by with No comments

स्थळ - बेडरूम.

वेळ - आत्ताची च थोड्या वेळापूर्वीची.

बेडरूम रुपी समरांगणावर लेकी ने संपूर्ण ताकदीने अतुल्य असा पराक्रम गाजवला आहे. टेंट ,किचन सेट ,पझल्स ,बुक्स अस जे काही आहे ते सगळं संपूर्ण बेड रूम मध्ये अगदी तब्येतीत पसरवून ठेवलं आहे.काही वेळात गृहमंत्री आले अन  एकंदरीत सर्व परिस्थिती चा अंदाज घेऊन लगेचच आदेश सोडला..." पर्णवी...सर्व पसारा आवरायचा आहे....सगळं मला जागेवर अन नीट आवरलेलं पाहिजे."

एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेत पर्णवी मातेने नेहमी प्रमाणे अशा वेळी संकटमोचक म्हणून धावणाऱ्या बाबा कडे कटाक्ष टाकला अन त्यानंतर चा आमचा संवाद....

अगदी लाडी गोडीत येऊन...मूळ प्रश्नाला हात न घालता...मस्त पैकी  मिठी मारून....गालावर एक पा घेत...बाबू....बबुडी ...बाबडी अस करत वातावरण निर्मिती करत...

"बाबू....हे बघ ना मी काय केलंय..."

"हे बघ...किचन च कस बनवलं आहे...."

"अरे हे बार्बी च बूट पाहिलं का..."

"बाबू...मी हे बघ मी आता टेंट मध्ये जाते हं...."

"बाबू...मी कुठाय शोध बर...."

अस बरंच काही सुरू झालं.

मग टेंट च्या कोपऱ्यातुन ..." बाबू ऐक ना...."

एकदम केविलवाणा चेहरा करत...."बाबू....किती रे पसारा झालाय...तू आवरणार ना... तू कर ना रे बाबा...अन झालं की मग आपण दोघे टेंट मध्ये झोपू या ना...."
[ कुठून अन कोणाकडून एवढा नाटकीपणा आलाय ते देवाक ठाऊक...ऑस्कर जिंकू शकेल अशी acting असते 😉😉]

मी : बच्चा....हा एवढा पसारा कोणी केला...

पर्णवी : मी केला ना रे

मी : मग कोण आवरणार हे सारं...

पर्णवी : तू....बाबू...अस करणार ना....आवरणार ना बाबू...कर ना रे....😂😂
[अगदी फुल ऑन इमोशनल....बाबाची विकेट कशी घ्यायची याची एकदम परफेक्ट ट्रिक लेकीला जमली आहे.….गोड बोलुन बरोबर कामाला लावणार...🙈🙈]

शेवटी काय बिच्चाऱ्या बाबा ने सगळा पसारा आवरून घेतला 🤣🤣🤣

0 Comments:

Post a Comment