06 October 2019

बरं!!

Edit Posted by with No comments

सध्या आम्हाला नवीन छंद लागलाय.दिवसभरात चार पाच वेळा कपडे बदलायचे मग आरश्या समोर उभं राहयचं.वेगवेगळ्या क्लिप्स लावून बघायचं....केसांची स्टाईल बदलायची मग जरा काहीतरी एकटंच आपलं बडबडत राहयचं.अन आपण गेलो की मग मला कशाला डिस्टर्ब करताय तुम्ही जा हॉल मध्ये मी काम करते आहे ना असं दरडावून सांगायचं.

मागच्या आठवड्यात असंच एकदा अवघ्या तासाभरात पर्णवी ने 3-4 वेळा ड्रेस बदलले.यानंतर मात्र मग सुजाताच रागावणं  सुरू झाल

"पर्णवी....हे काय चाललंय तुझं....सारखे सारखे का ड्रेस बदलते आहे."

"..."

"अग काय म्हणते आहे मी....अन ऐक आता इथून पुढे अस वागली तर तुझी काम मी करणार नाही...समजलं..."

"...."

"यापुढे मला हे अस वागलेलं चालणार नाही अन असच वागणार असशील तर मी तुझी काम करणार नाही.मग तू बाबू ला सांग की माझी कामं करायला एक कामवाल्या मावशी ठेव म्हणून...ठीक आहे"

"...."

अस बराच वेळ सुजाता च बोलणं सुरू होत पण पर्णवी माता ढिम्म...इतकासा सुद्धा भाव न देता तिचं आपलं गुंग होऊन खेळणं सुरू होत.

शेवटी वैतागून मग सुजाता म्हणाली...."पर्णवी...तुला लक्षात आलंय ना मी काय सांगितलं ते..."

"हो ग आऊ...."

"काय लक्षात आलंय...सांग...."

यावर अगदी शांतपणे उत्तर आलं...." हेच...बाबू आला की त्याला सांगायचे माझी कामं करायला कामवाल्या मावशी ठेवायच्या आहेत..."🤣🤣🤣😂😂😂😂

#आम्ही_तेच_ऐकतो_जे_आम्हाला_हवं

0 Comments:

Post a Comment