महाराजांच्या गोष्टी, महाराजांचे नुकतेच आलेले जवळपास सगळेच चित्रपट पाहिल्या मुळे खूप दिवसांपासून पर्णवी ला शिवनेरी वर घेऊन जायचं बकेट लिस्ट मध्ये होत पण त्याचा काही योग काही जुळून यरत नव्हता .पण अखेरीस यावेळी दिवाळीच्या सुट्टी मध्ये पर्णवी गावी गेली तेव्हा सुजाता सोबत शिवनेरी ला जाण्याचा योग आला.शिवनेरी वर महाराजांचं जन्मस्थळ पाहून तर पर्णवी खूप खुश झाली होती लगेच तिथूनच मला व्हिडिओ कॉल आला अन लगेच...
24 November 2022
19 November 2022
दप्तरपुराण !!
Edit Posted by Yogesh with No commentsपसारा पुराण नंतर सर्वात संवेदनशील मुद्दा रोज संध्याकाळी दप्तर म्हणजे स्कुल बॅग 😉 भरायची कोणी...अर्थात हे प्रकरण सुजाता अन पर्णवी अस दोघीं मध्येच असतं. मला ऑफीस वरून यायला उशीर होतो त्यामुळे मी येईपर्यंत मायलेकी मध्ये यावरून तू तू मी मी झालेली असते.कधी काळी जर चुकून लवकर आलो तर या तू तू मी मी चा साक्षीदार असतो.दोनेक आठवड्यापूर्वी बॅग कोणी भरायची यावरून माय लेकी एकमेकांना ऑर्डर देत होत्या. अन त्यावरून...
शायनर!!
Edit Posted by Yogesh with No commentsवायरल मुळे मी दोनेक दिवस झोपून होतो म्हणून सकाळी आई मी उठल्यावर मला विचारत होती की आराम वाटतो आहे का ? त्रास होत असेल तर डॉक्टर कडे पुन्हा एकदा जाऊन ये.अस आमचं बोलणं सुरू होतं तेच पर्णवी आंघोळ करून आली म्हणे ..."आजी...बाबा ला आता काही नाही झालं...तो तू आहेस म्हणून फक्त शायनिंग मारतोय... हा बाबा ना शायनर आहे..."यानंतर मग मग आजी अन नाती मध्ये झालेलं हे गप्पाष्टक."शायनर... म्हणजे काय ग पर्णवी... मला...
Subscribe to:
Posts (Atom)