16 November 2019
14 October 2019
माया 🙂
Edit Posted by Yogesh with No commentsसोमवार सकाळ म्हणजे युद्धजन्य सकाळ असते.वीकेंड चा hangover काही गेलेला नसतो त्यामुळे सोमवार म्हणजे एकदम alert मोड वर असतो.
आज सकाळी माझी आवरायची धावपळ सुरू होती.पर्णवी मात्र अगदी निवांत होती. शांतपणे आपलं खाण्यात गुंग होती.मी पूजा करून आलो अन ऑफिस साठी तयार होत होतो तर अचानक आदेश आला.
"बाबू...ए बाबू....इकडे ये..."
"हं.... बोल काय झालं..."
"ऐक ना....डोळे बंद कर अन खाली वाक...."
"का...काय झालं...."
"वाक ना रे बाबू....अन डोळे बंद...."
अजून उशिर नको म्हणून वाकलो अन डोळे बंद केले....तर इटूकला हात शर्ट च्या खिशात गेला...काहीं कळत नव्हतं काय करते आहे ते...
"हं... झालं...आता उघड डोळे..."
"का ग काय झालं..."अस म्हणत खिशात बघत होतो तोच म्हणे..
"तुझ्या खिशात ड्राय फ्रुट ठेवले आहे....ऑफिस मध्ये गेलास की आठवणी ने खा..."
पाहिलं तर तिला सकाळी दिलेल्या ड्राय फ्रुट मधील दोन मनुके अन एक काजू माझ्या खिशात टाकला होता.😍❤️😘
06 October 2019
बरं!!
Edit Posted by Yogesh with No commentsसध्या आम्हाला नवीन छंद लागलाय.दिवसभरात चार पाच वेळा कपडे बदलायचे मग आरश्या समोर उभं राहयचं.वेगवेगळ्या क्लिप्स लावून बघायचं....केसांची स्टाईल बदलायची मग जरा काहीतरी एकटंच आपलं बडबडत राहयचं.अन आपण गेलो की मग मला कशाला डिस्टर्ब करताय तुम्ही जा हॉल मध्ये मी काम करते आहे ना असं दरडावून सांगायचं.
मागच्या आठवड्यात असंच एकदा अवघ्या तासाभरात पर्णवी ने 3-4 वेळा ड्रेस बदलले.यानंतर मात्र मग सुजाताच रागावणं सुरू झाल
"पर्णवी....हे काय चाललंय तुझं....सारखे सारखे का ड्रेस बदलते आहे."
"..."
"अग काय म्हणते आहे मी....अन ऐक आता इथून पुढे अस वागली तर तुझी काम मी करणार नाही...समजलं..."
"...."
"यापुढे मला हे अस वागलेलं चालणार नाही अन असच वागणार असशील तर मी तुझी काम करणार नाही.मग तू बाबू ला सांग की माझी कामं करायला एक कामवाल्या मावशी ठेव म्हणून...ठीक आहे"
"...."
अस बराच वेळ सुजाता च बोलणं सुरू होत पण पर्णवी माता ढिम्म...इतकासा सुद्धा भाव न देता तिचं आपलं गुंग होऊन खेळणं सुरू होत.
शेवटी वैतागून मग सुजाता म्हणाली...."पर्णवी...तुला लक्षात आलंय ना मी काय सांगितलं ते..."
"हो ग आऊ...."
"काय लक्षात आलंय...सांग...."
यावर अगदी शांतपणे उत्तर आलं...." हेच...बाबू आला की त्याला सांगायचे माझी कामं करायला कामवाल्या मावशी ठेवायच्या आहेत..."🤣🤣🤣😂😂😂😂
#आम्ही_तेच_ऐकतो_जे_आम्हाला_हवं
साधं सोपं !!
Edit Posted by Yogesh with No commentsरात्री झोपण्यापूर्वी आमच्या गप्पा सुरू होत्या.असंच आपलं नेहमी प्रमाणे मस्ती चालली होती.मी सहजच पर्णवी ला म्हणालो...
"अरे माझं पिल्लू....किती वेळ झालं मी नी ला भेटलंच नाही...किती रे तुझी आठवण येते..."
बाबा वेडा आहेस का तू type चेहरा करत..."अरे बाबू अस काय करतोय...सकाळीच तर आपण स्कुल ला गेलो नाही का...आपण गाणं म्हणत गेलो...काय रे तू" [किमान शब्दात कमाल फटके...पुण्याचं पाणी ...🤣🤣🤣😂😂]
"अरे बच्चा....तस नाही रे ...त्यानंतर मग कुठे आपण भेटलो...दुपारी तू स्कुल मध्ये आल्या पासून आपण भेटलो का तरी....मी तर ऑफिसमध्ये होतो..."बाजू सावरायचा आपला केविलवाणा प्रयत्न 😛
"मग त्यासाठी कधी तरी हाफ डे घ्यायचा असतो..." [हे अस बोलायला कस सुचतं हे देवाक ठाऊक...🤔🤔]
"म्हणजे रे काय??"
"अरे बाबू...म्हणजे तू ऑफिस ला जायचं अन माझी स्कुल संपते तोपर्यंत काम करायचं अन मग घरी यायचं...म्हणजे हाफ डे"
"अरे बच्चू....पण मला असा हाफ डे नाही घेता येत...काम असतं...कसा घेणार मग हाफ डे...सांग बरं..."
"कसा म्हणजे....तुझ्या सरांकडे जायचं....त्यांना सांगायच माझ्या मुलगी ची मला आठवण येते आहे...म्हणून मग मी आता घरी जातो...अन घरी यायचं....अन मग आपण मस्ती करायची....झालं..."
I wish....आयुष्य हे असच इतकं अगदी साधं सरळ सोपं असतं तर....पण अस नाहीये...आता या इवल्याशा जिवाला काय समजावू अन कस समजावू तुला वाटत इतकं सोपं नसत 🤗🤗👼
पहिला गुरू !!
Edit Posted by Yogesh with No commentsपर्णवी ची शाळेत Show N Tell अशी activity आहे त्यामुळे दोन दिवस काय करायचं....सोपं काय जाईल अस सगळं विचार करून ठरलं...काल पासून त्याची तयारी सुरू झाली.आज सकाळी शाळेत जाताना पण बऱ्यापैकी गोष्टी मधून तिला समजावलं होत.अन दुपारी शाळेतून आलीस की आऊ तुझ्या कडून प्रॅक्टिस करून घेईल अस आमचं ठरलं पण होतं.लेकरू किती गुणी आहे अगदी किती सहज ऐकल.चला आता सुजाता सोबत प्रॅक्टीस होईल म्हणून मी आपला निवांत होतो.
पण हा आनंद फार काळ टिकला नाही.कारण दुपारी फोन आला अन आदेश सुटला...
"बाबू...संध्याकाळी तू लवकर ये मी आता काही प्रॅक्टिस करणार नाही...समजलं..."
"अरे बच्चा...तू तर मला म्हणाला....."अस म्हणे पर्यंत पलीकडून फोन वरून कल्टी मारण्यात आली होती.बघ आता संध्याकाळी ये लवकर..उशीर नको करूस...असा पुढचा आदेश निघाला.
अरे हे तर शुद्ध साजूक तुपातलं अगदी घोळून घोळून गंडवण आहे रे...बाबा बिचारा गरीब...लेकीच्या भोळ्या चेहऱ्यावर गेला अन फसला की.
संध्याकाळी लवकर घरी पोहचलो तर मला जरा खेळू दे, जिजा बघू दे, शंभू बाळ बघू दे,जेवण करू दे हे असले प्रकार सुरू झाले.सकाळची ठेच रात्रीस शहाणा...त्यामुळे जास्त नाटकं न चालवून देत जेवण झाल्यावर पर्णवी ला घेतलं अन बेड मध्ये आलो.आता प्रॅक्टीस सुरू करायची म्हणणार तर लगेच म्हणे..
"बाबू...मी आऊ सोबत म्हणणार आहे...तू नाही"
"पर्णवी ....अजिबात नाही...तू दुपारी मला म्हणाली होती माझ्या सोबत प्रॅक्टीस करणार म्हणून मग आता आऊ कशाला?"
"नो म्हणजे नो....मला आऊ च पाहिजे"
"आऊ येणार नाही...माझं ऐकायचं...मीच प्रॅक्टिस घेणार...तुला कशासाठी आऊ पाहिजे ते बोल आधी..."
"बाबू तुला माहीत नाही का...काय सांगितलं होत...आई पहिला गुरू असतो अन बाबा दुसरा गुरू.....बरोबर ना"
"हो ...पण आता त्याच काय?"
"मला माझ्या पहिल्या गुरू कडून च प्रॅक्टीस करायची आहे.....दुसऱ्या कडून नकोय काही...अन सांगितलं ना पहिल्या गुरुच चं ऐकायचं असतं"
घ्या #आपलेच_सुविचार_आपल्याच_चरणी_सप्रेम
आरं अस कुठं असतंय व्हय...उगं आपलं बिचाऱ्या साध्य सरळ बाबा ला गंडवायच
20 September 2019
लग्न!!
Edit Posted by Yogesh with No commentsकधी कधी साध्या गप्पा अन गंमत करता करता जेव्हा तुमच्या लक्षात येत की दोस्ती मध्ये कुस्ती झाली अशा वेळी फक्त माघार घेणं किंवा लेकराला मूळ मुद्द्यापासून दूर करणं हाच एकमेव पर्याय असतो.
दोनेक आठवड्यापूर्वी मी,पर्णवी अन आई आम्ही भाजी घेण्यासाठी मंडई ला गेलो होतो. आई ला भाजी घ्यायला सोडलं अन मग आम्ही दोघे गप्पा मारायला मोकळे झालो.रायगड ट्रेक ची अर्धी राहिलेली गोष्ट पूर्ण करायची होती म्हणून मग त्यावरून आमच्या गप्पा सुरू झाल्या.आता खूप सारे काका लोक आहेत मग कधी कधी मग तिचा गोंधळ होतो.
बाबू.....अरे हेमंत काका ,सचिन काका अन तू सोबत राहायचा ना मग धनु काका का नव्हता? इथून मग जे सुरू झालं त्यात रायगड मागे पडला अन वेगळ्याच गडावर आमची लढाई सुरू झाली.
मग माझ्या लहानपणी चा विषय निघाला.नुकतीच ती गावाकडं गेली होती तेव्हा जवळ असलेल्या डोंगरावर फिरायला गेले होते.तर त्यावरून पण ऐकवलं लगेच...मी तर बघ ज्यु.केजी लाच आहे तर उंच डोंगरावर एकटी चढले तू तरी चढला होता का?
आता बाबा पण काय कमी आहे होय...माघार कशाला घेणार...सांगून दिलं...हो मग....मी,आत्तु ,आजी अन आजोबा आम्ही जायचो तेव्हा मी पण एकटा डोंगरावर जायचो.एवढं काय बोललो तेच लगेच प्रतिक्रिया आली.
"बाबू....तुला पण माझ्या सारखं लहानपणीच आठवत की" 🙈
यातून सावरतोय तोच पुढचा बॉम्ब पडला.
"बाबू....तुझ्या लहानपणी तेव्हा मी कुठे होते रे ...मला नव्हतं ना नेलं तेव्हा....असच करायचा ना तू."
"अरे बच्चा तू नव्हता तेव्हा..." माझा आपला सावरायचा वेडा वाकडा प्रयत्न सुरू झाला तोच पुढील प्रश्न..
"आऊ कुठे होती तेव्हा...तिला पण नाही नेलं ना.."
आता हिला नीट समजावं म्हणून मी आपला सुरू झालो...
"चिकू....अरे तेव्हा आम्ही लहान होतो ना त्यामुळे आम्ही तेव्हा भेटलो नाही....मग मोठे झालो ना त्यानंतर मी आणि आऊ भेटलो...मग आमचं लग्न झालं अन मग तू आलीस....अगदी असंच आजी आजोबा लहान होते तेव्हा मी नव्हतो...मग ते मोठे झाले...त्यांच लग्न झालं अन मी आलो..."
हुश्श...मला वाटलं सुटलो एकदाचा...पण कसलं काय..
"मग बाबू माझं लग्न कधी होणार रे...."😂😂😂
"अरे बच्चा...तू अजून लहान आहे...मोठा झाला ना तू की मग बघू"
"असंच करणार ना तू...नको करुस माझं लग्न...तू ,आऊ ,आजी,आजोबा सगळ्यांनी लग्न केलं...माझंच कोणी लग्न करत नाही....मी छोटू आहे ना अस करणार ना तू...मी नाही बोलणार तुझ्याशी....कट्टी आता...असंच करतो तू..." 😂😂🤣🤣🤣
अस म्हणून रागावून नाक फुगवून बसलेलं निरागस पिल्लू बघताना माझी हसून पुरेवाट झाली होती पण परिस्थिती बिघडू नये उगाचंच हसू दाबून ठेवलं होत....मग हळूच खाण्यावर विषय नेला अन All matter settled. एकदा खाऊगिरी सुरु झाल्यावर मग बाकी सगळं विसरून पाव भाजी,डोसा,आईस्क्रीम काय काय बाकी आहे याचा हिशोब झाला बाकी काही नाही.😂😂😂😂
ए चा एकार !!
Edit Posted by Yogesh with No commentsमी, भाचा अद्वय अन पर्णवी असा तिघे मिळून विकांताला सकाळी खादाडी सुरू होती. मी आपलं काही तरी गंमत करत त्यांना भरवत होतो.
तेवढ्यात अचानक आदु ला काही तरी exciting आठवलं अन मला थांबवत बोलू लागला...त्याला सांगायची excitement एवढी होती की त्या नादात मला म्हणू लागला..
" ए....ए...अरे...ऐक ना...मी एक सांगू...."
"ए...ऐकतो ना...ऐक ना ...ए..."
यानंतर आता पर्यंत शांत असलेल्या पर्णवी मातेने रुद्रावतार धारण केला अन म्हणू लागली...ते पण अगदी डोळे मोठे करून एक हात कंबरेवर अन दुसऱ्या हाताच बोट उगारून...
"अद्वय....गप्प बस...माझं ऐक...."
"काय बोललास आता तू....अद्वय ...सांग काय बोललास"...
"हे ए...ए...ए...करून का बोलतो आहेस? तुझा मामा आहे ना तो....आहे की नाही?....मग मामा म्हणून हाका का नाही मारली...बोल मामा...अन मामा म्हणून हाका मार....अन परत ए म्हणायच नाही....समजलं.."
माझ्यासाठी तर हा surprise item होता.मला काही समजलं च नाही हिला अचानक एवढं राग यायला काय झालं.म्हणून मी आपलं फक्त तिच्याकडे बघत म्हणलं...पर्णवी....काय हे..अचानक हे काय आता??
तर म्हणे....."तू मामा आहेस ना त्याचा...मग मामा म्हणायला हवं ना...माझ्या बाबाला कोणीही ए म्हणून बोलावलेलं मला चालणार नाही."😀😀😀😍😍
अन परत आदु कडे बघत म्हणे..."काय रे अद्वय ...समजलं ना.." 😀😀
किती ते बाबावर प्रेम 😉❤️


