21 November 2019

वाढीव !!

Edit Posted by with No comments

सध्या पर्णवी ला सकाळी शाळेत सोडावं लागतं.जाताना मग आमचं रोज गप्पाष्टक सुरू असत.रोज नवीन काहीतरी विषय असतो.

आज सकाळी आम्ही जात होतो तेव्हा गप्पा सुरू असताना पर्णवी ने अचानक विचारलं....

"बाबू...रस्ता कशासाठी असतो?"

मी आपलं अगदी सिरीयस होऊन...सोपं करून सांगू लागलो

"रस्ता आपल्याला ये जा करण्यासाठी असतो...म्हणजे बघ आता आपल्याला घरापासून स्कुल ला जायचं आहे...कस जाणार? त्यासाठी रस्ता हवा..."

"अच्छा ...मग स्कुल कशासाठी असते?"

"स्कुल आपल्याला शिकण्यासाठी असतं"

"अच्छा...."
असंच मग अजून हे कशासाठी ,ते कशासाठी अश्या दोन तीन गोष्टी विचारल्या तेव्हा मग लक्षात आलं मातेच्या डोक्यात काही तरी खिचडी पकते आहे.अन असा विचार करे पर्यंत लगेचच गुगली आलाच.

"बाबू...मग आता सांग आईस्क्रीम कशासाठी असते?"

मी म्हणलं..."खाण्यासाठी..."

"हो की नाही...अरे बाबू ...आपण तर किती दिवस झाले आईस्क्रीम च खाल्लं नाही."

मग माझ्या लक्षात आता पर्यंत ची खिचडी का पकवली होती ते 😉

हम भी कुछ कम नहीं....यावर शक्य तितकं निर्विकार राहून कोणतीच प्रतिक्रिया नाही दिली...अन अगदी नकळत विषय गणपती बाप्पा वर नेऊन टेकवला 😂😂😂

शेवटी #बाप_है_हम

19 November 2019

टोचणी 😀

Edit Posted by with No comments
सकाळी ऑफिसला निघालो, गाडीवर बसल्यावर लक्षात काहीतरी टोचत आहे. तेव्हा वाटलं गाडीच्या सीटचा काही तरी प्रॉब्लेम आहे. 

तसाच ऑफिसात पोहचलो तर डेस्कवर बसल्यावर पण स टोचणी... तेव्हा पण वाटलं ऑफिसच्या खुर्ची मध्ये काहीतरी गडबड आहे.

संपूर्ण दिवस जिकडे जाईल तिथं बसलो की टोचणी...पण कामाच्या गडबडीत जास्त लक्ष दिलं नाही.बॅक पॉकेट ला मी बहुतांश वेळा किंबहुना कधीच काही ठेवत नाही त्यामुळे पॉकेट मध्ये काही असेल अस वाटलंच नाही.

शेवटी संध्याकाळी विचार केला सगळ्याच ठिकाणी सीट कशा काय खराब असतील.आपल्याकडेच काहीतरी गडबड असणार म्हणून सहजच बॅक पॉकेट मध्ये पाहिलं तर लेकीच्या क्लिप निघाल्या.🤣🤣🤣😂😂😂😂

मग ट्यूब पेटली दोन दिवसांपूर्वी बाहेर गेलो होतो तेव्हा पर्णवी ने मस्ती करताना पॉकेट मध्ये क्लिप टाकल्या होत्या.अन नंतर मी पण विसरून गेलो होतो.हल्ली असंच आहे बांगडी,क्लिप वगैरे वगैरे सापडत असतं 🙊🙈

#टोचलेल्या_बाबाची_कहाणी 

18 November 2019

कांदे बटाटे 😂

Edit Posted by with No comments
आत्ता रात्री जेवणाच्या वेळी सुजाता ने काकडी धुवून स्वच्छ करून ठेवली होती पण नेमकं जेवण करायला बसताना तिच्या लक्षात राहिलं नाही अन काकडी घ्यायची राहून गेलं.

जेवण झाल्यावर मग किचन आवरताना सुजातच्या लक्षात आलं की आपण काकडी धुवून ठेवली होती मात्र कापून घ्यायला विसरलो आहोत.

सहजच सुजाता पर्णवी ला म्हणाली..."पर्णवी...अग बघ जेवताना काकडी कापून घ्यायचीच विसरलो...ती धुतलेली काकडी तशीच राहिली."

तर यावर उत्तर आलं...."अग आऊ ....या माझ्या डोक्यात ना कांदे बटाटे भरले आहेत..."

सुजाताला काही समजलं नाही...म्हणून मग तिने परत विचारलं..."काय...कसले कांदे बटाटे??...काय म्हणते आहेस"

"अग हे माझं डोकं आहे ना...यात कांदे बटाटे भरले आहेत...त्यामुळे न आता मला लक्षातच काही राहत नाहीये"😂😂🤣🤣🤣🤣

ह्या वाक्याबरोबर हास्यकल्लोळ झाला...यातून सावरे पर्यंत लगेच पुढचा आदेश आला...

"आता राहू दे...काही कापत बसू नको...मी तशीच काकडी खाऊन टाकते..."अस म्हणतं काकडी गट्टम पण झाली.

जेवणानंतर पण खाण्याचा हा वारसा कुठून आला असावा हे.सां.न.ला.🙈🙊😂😂🤣🤣


16 November 2019

मला सहन होत नाही!!

Edit Posted by with No comments
दोनेक आठवड्यापूर्वी विकांताला आज नाश्ताला घरी नको बनवायला बाहेरून काही तरी आणू अस सुजाताचं अन माझं बोलणं सुरू होतं.बाहेरून नाश्ता म्हणलं की डोसा हा चिकूचा पर्यायाने आमचा फिक्स आयटम असतो.
बाबांना काय हवंय म्हणुन मी त्यांना विचारत होत. तर बाबा म्हणाले मला नको काही आणू...बाहेरचं मला काही सहन होत नाही...बाहेरच्या खाण्याचा मला त्रास होतो त्यामुळे तुमच्या पुरतं आणा. बाजूलाच पर्णवी पण होती...बाबा नको म्हणाल्यावर लगेच इमोशनल ब्लॅकमेल सुरू आजोबी अस करणार ना तुम्ही? थोडंस खा की....अगदी छोटू...जास्त नको...वगैरे...वगैरे...
शेवटी मीच म्हणालो "चिकू...नको बच्चा...आजोबांना सहन होत नाही त्यामुळे आग्रह नको करू."
आता हे अगदी नेहमी सारखंच आपलं बोलणं पण हे आपल्या साठी....हे बोलणं भविष्यात आपल्याला अंगलट येऊ शकत याची अस्मादिकांना यत्किंचितही कल्पना नव्हती.
त्यांनतर मग साधारण आठेक दिवसांनी रात्री आम्ही जेवण करत होतो.पर्णवी ने संध्याकाळी थोडं फार खाल्लं होत त्यामुळे तिला काही भूक नव्हती. पण रात्री भूक लागेल म्हणून बाबा तिला म्हणाले..."पर्णवी....तस झोपू नको...थोडंस डाळ भात खा"
तर यावर लगेच प्रत्युत्तर आलं..."नको आजोबा...मला सहन होत नाही.." हे ऐकल्यावर आम्ही ओळखलं काही तरी गडबड आहे 😂😂😂
मग मी म्हणालो..." काय...सहन होत नाही म्हणजे?"
तर मानेला झटका देत एवढं पण याला समजत नाही असा तिरकस कटाक्ष टाकत म्हणे..."अरे बाबू...आजोबांना कसं बाहेरचं म्हणजे डोसा,पावभाजी,वडा पाव सहन होत नाही नं तसच मला डाळ भात अन पोळी भाजी सहन होत नाही" 😂😂🤣🤣🤣

बालदिन !!

Edit Posted by with No comments
लेकीच्या शाळेत आज बालदिनानिमित्त नाईट आउट आहे.मागील आठवडाभर फुल ऑन excited होती. रोज चार वेळा ऐकवून व्हायचं.दिवस मोजायच काम सुरू होतं.

काल शाळेला सोडताना मला म्हणे ....बाबू तुमचं असायचं का रे नाईट आउट?

मनात म्हणलं कसलं आलंय डोंबलाच नाईट आउट...आमच्या काळी अस काही नव्हतं 🙈🙊

म्हणलं.... नाय रे बच्चा....आमच्या शाळेत नव्हतं अस काही.

तर म्हणे.... काय ? तुमच्या शाळेत नव्हतं अस काही... मग काय असायचं ?

बोलण्याच्या टोन वरून लक्षात आलं....हिला काय वाटत आहे ते 🤣🤣🤣

असो...पण मज्जा आहे लेकरांची....शाळेत मस्त पैकी डिनर, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी.
कालानुरूप भरपूर काही बदलत चाललं आहे....शाळेतील मजा मस्ती ची व्याख्या पण बदलली आहे.





14 October 2019

माया 🙂

Edit Posted by with No comments

सोमवार सकाळ म्हणजे युद्धजन्य सकाळ असते.वीकेंड चा hangover काही गेलेला नसतो त्यामुळे सोमवार म्हणजे एकदम alert मोड वर असतो.

आज सकाळी माझी आवरायची धावपळ सुरू होती.पर्णवी मात्र अगदी निवांत होती. शांतपणे आपलं खाण्यात गुंग होती.मी पूजा करून आलो अन ऑफिस साठी तयार होत होतो तर अचानक आदेश आला.

"बाबू...ए बाबू....इकडे ये..."

"हं.... बोल काय झालं..."

"ऐक ना....डोळे बंद कर अन खाली वाक...."

"का...काय झालं...."

"वाक ना रे बाबू....अन डोळे बंद...."

अजून उशिर नको म्हणून वाकलो अन डोळे बंद केले....तर इटूकला हात शर्ट च्या खिशात गेला...काहीं कळत नव्हतं काय करते आहे ते...

"हं... झालं...आता उघड डोळे..."

"का ग काय झालं..."अस म्हणत खिशात बघत होतो तोच म्हणे..

"तुझ्या खिशात ड्राय फ्रुट ठेवले आहे....ऑफिस मध्ये गेलास की आठवणी ने खा..."

पाहिलं तर तिला सकाळी दिलेल्या ड्राय फ्रुट मधील दोन मनुके अन एक काजू माझ्या खिशात टाकला होता.😍❤️😘

06 October 2019

बरं!!

Edit Posted by with No comments

सध्या आम्हाला नवीन छंद लागलाय.दिवसभरात चार पाच वेळा कपडे बदलायचे मग आरश्या समोर उभं राहयचं.वेगवेगळ्या क्लिप्स लावून बघायचं....केसांची स्टाईल बदलायची मग जरा काहीतरी एकटंच आपलं बडबडत राहयचं.अन आपण गेलो की मग मला कशाला डिस्टर्ब करताय तुम्ही जा हॉल मध्ये मी काम करते आहे ना असं दरडावून सांगायचं.

मागच्या आठवड्यात असंच एकदा अवघ्या तासाभरात पर्णवी ने 3-4 वेळा ड्रेस बदलले.यानंतर मात्र मग सुजाताच रागावणं  सुरू झाल

"पर्णवी....हे काय चाललंय तुझं....सारखे सारखे का ड्रेस बदलते आहे."

"..."

"अग काय म्हणते आहे मी....अन ऐक आता इथून पुढे अस वागली तर तुझी काम मी करणार नाही...समजलं..."

"...."

"यापुढे मला हे अस वागलेलं चालणार नाही अन असच वागणार असशील तर मी तुझी काम करणार नाही.मग तू बाबू ला सांग की माझी कामं करायला एक कामवाल्या मावशी ठेव म्हणून...ठीक आहे"

"...."

अस बराच वेळ सुजाता च बोलणं सुरू होत पण पर्णवी माता ढिम्म...इतकासा सुद्धा भाव न देता तिचं आपलं गुंग होऊन खेळणं सुरू होत.

शेवटी वैतागून मग सुजाता म्हणाली...."पर्णवी...तुला लक्षात आलंय ना मी काय सांगितलं ते..."

"हो ग आऊ...."

"काय लक्षात आलंय...सांग...."

यावर अगदी शांतपणे उत्तर आलं...." हेच...बाबू आला की त्याला सांगायचे माझी कामं करायला कामवाल्या मावशी ठेवायच्या आहेत..."🤣🤣🤣😂😂😂😂

#आम्ही_तेच_ऐकतो_जे_आम्हाला_हवं