02 October 2021
01 October 2021
पोस्टमन !!
Edit Posted by Yogesh with No commentsकरोना मुळे यावर्षी सुद्धा आई ला रक्षाबंधन साठी मामा कडे गावी जाणं शक्य होणार नव्हतं त्यामुळे आपण राख्या पोस्टाने पाठवून देऊ असं ठरलं. सध्याच्या डिजिटल गोष्टींमुळे पोस्ट,पत्र ,तार इ.इ. जी जुनी संपर्क संसाधने आहेत ही या नव्या पिढीला काही माहित नाहीत. पर्णवी ला पोस्ट ऑफिस , पत्र , पोस्टमन याबद्दल सांगितलं होत.
चार दिवस अगोदर राखी पाठवून पण मामा ला रक्षाबंधन ला राखी काही मिळाली नाही. आई मग त्यावरून दोन तीन वेळा म्हणाली , राखी कशी काय मिळाली नसेल, काय झालं असावं बरं ? पत्ता वगैरे तर बरोबर टाकला होता ना कि हरवल्या असाव्यात असं बरच काही बोलणं सुरु होत. आमचं हे बोलणं सुरु असताना पर्णवी जवळच खेळत बसली होती. खेळता खेळता अचानक म्हणे,
" अगं आजी ... रक्षाबंधन होत ना मग पोस्ट ऑफिसला पण सुट्टी असेल ना ?"
" ते पोस्टमन काकांना पण राखी बांधायला त्यांच्या ताई कडे जायचं असेल ना ?"
" अन आता तुला कस वाईट वाटत आहे तसच जर पोस्टमन काका गेले नाही तर त्यांच्या बहिणीला पण वाईट वाटेल ना ?"
" आता ते राखी बांधून आले ना कि मग मामा आजोबांना राख्या मिळतील"
इतक लहान लहान गोष्टीं मध्ये सुद्धा असा विचार करणाऱ्या पर्णवी ला बघून मला मस्त वाटलं 😊
10 August 2021
असं का बरं ?
Edit Posted by Yogesh with No commentsजेव्हा आपल्या मनाची पाटी कोरी असते तेव्हा आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. लहान मुलांचं अगदी असंच असतं .त्यांच्या मनाची पाटी कोरी असते त्यामुळे जे त्यांना दिसतं ते आपल्या मोठयांना दिसत नाही. मग कधी तरी त्यांच्या कडून त्याबद्दल बोललं गेलं की ती गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते तर कधी अंतर्मुख करते. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं.
माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मी, सुजाता , भाचा अद्वय अन पर्णवी असं चौघे जण गेलो होतो. चिल्लर गॅंग बरेच दिवस घराबाहेर कुठे गेले नव्हते त्यामुळे बाहेर जायचं म्हणून दोघे पण खूप खुश होते. करोना मुळे तर वाढदिवस, हॉटेल किंवा बाहेर कुठे बागेत जाणे वगैरे अशे सारे प्रकार अगदी बंदच झाले आहेत त्यामुळे करोना काळात कंटाळलेल सर्वात जास्त कोण असेल तर ते चिल्लर कंपनी . बऱ्याच दिवसांनी बाहेर पडल्यामुळे मग बाहेरची गंमत बघण्यात अन मस्ती करण्यात दोघे जण व्यग्र होते. अन सोबत प्रश्न याची जंत्री सुरूच होती.
मित्राकडे पोहचलो तेव्हा लहानग्याचे खेळ सुरु होते. सगळी धम्माल सुरु होती. अद्वय ची लगेच मस्ती सुरु झाली पण पर्णवी ला मात्र जरा वेळ लागला. तिचं आपलं निरीक्षण सुरु होतं . जरा वेळाने मात्र खेळणं सुरु झालं. असाच थोडा वेळ गेला असेल पर्णवी सुजाता कडे आली अन म्हणे...
" आई , मला एक सांग इथे सगळी लहान मुलं , ताई अन दादा आहेत सर्व जण खेळत आहेत मात्र ती तिकडे एक ताई आहे पण ती मात्र खेळत नाहीये . ती तर तिच्या आई सोबतच थांबली आहे. ती तर इकडे आली पण खेळली नाही. असं का बरं ?"
ती मुलगी म्हणजे मित्राच्या घरात ज्या मावशी येतात त्यांची मुलगी होती, तशी ती त्यांच्या घरातील माणूस असल्यासारखीच आहे पण इतकी सगळी मुलं अन लोक पाहून ती बावरली होती अन तिच्या आई जवळ जाऊन थांबली होती. इतक्या सगळ्या गोंधळात हे मात्र कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं तेच नेमकं मात्र पर्णवी च्या लक्षात आलं. 😊😊
09 August 2021
शाळा !!
Edit Posted by Yogesh with No comments17 July 2021
गप्पाष्टक 04
Edit Posted by Yogesh with No comments04 July 2021
देव बाप्पा !!
Edit Posted by Yogesh with No comments22 June 2021
गप्पाष्टक 03
Edit Posted by Yogesh with No comments
करोना मुळे मागील वर्षी पर्णवीची शाळा म्हणजे एकदम धम्माल झाली.ऑनलाइन शाळा म्हणजे फक्त रेकॉर्ड केलेले व्हिडिओ यायचे अन ते आपण आपल्या सोयीनुसार बघायचे व त्यानंतर होमवर्क करायचा. होमवर्क झाला की तो व्हाट्सएपच्या ग्रुपवर टीचर ना पाठवून द्यायचा.अस सारं होत.एकंदरीत सगळे मूड स्विंग बघता शाळा पर्णवी ची पण परीक्षा मात्र सुजाताची असायची.आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तेव्हा लिहण्याचा विसर पडू नये म्हणून टीचर रोज एक लहानशी स्टोरी पाठवून द्यायच्या अन आपण सराव म्हणून ती लिहायची असं होतं. सुट्टी मध्ये पण अभ्यास करायचा का, मग जरा वेळाने लिहिते, मला भूक लागली, मला energy घेऊ दे जरा, मला एक बदाम अन एक पिस्ता खाल्ला की मगच energy येते, लिहताना चा आम्ही एकदम कोणत्या तरी तिसऱ्या जगात जायचो मग वेगळंच काही आठवणार वगैरे वगैरे अस सगळं करत चार ओळी लिहणे म्हणजे हा किमान 2 ते 3 तासांचा कार्यक्रम व्हायचा.
एक दिवस मग सुजाता ने कंटाळून जाहीर केलं, तू आज लिहिण्याचा सराव केला नाही त्यामुळे आता मी टीचर सोबत बोलले आहे अन त्यांना सांगून दिल आहे की ,"आमच्या पर्णवी ला लिहण्याचा कंटाळा येतोय त्यामुळे ती काही सराव करणार नाही, अन आज पण तिने काही लिहिलेलं नाहीये." अन यावर टीचर ने सांगितलं आहे की...."ठीक आहे, पर्णवी लिहीत नाही ना मग आम्ही तिला आता ग्रुप मधून काढून टाकतो.पहिली ची शाळा सुरू झाली की मग बघू."
हे ऐकल्यावर मग सुरुवातीला पर्णवी ला गंमत वाटली, तिला वाटलं आई मजा करते आहे.पण नंतर मग आई च्या म्हणण्याला बाबा पण हो म्हणतो आहे म्हणजे नक्की असंच झालं असणार.मग मात्र स्वारी काहीशी खट्टू झाली पण तस काही दाखवलं नाही.
संध्याकाळी मग आत्या कडे गेल्यावर मात्र सार पुराण सुरू झालं...आत्या ला म्हणे....
"आत्तु, तुला माहीत आहे का आज काय झालं...."
"नाही....का ग ...काय झालं..."
"अग, आऊ ने आज माझ्या टीचर ला फोन केला होता अन मी गोष्ट लिहली नाही ते सांगून दिलं..."
"अस होय.....बरं मग काय झालं..."
"अन मग त्यांनी म्हणाल की पर्णवी ने नाही ना लिहलं मग आम्ही तिला ग्रुप अन ऍप मधून काढुन टाकतो....अन मला आता काढून पण टाकलं आहे."
"अरे बापरे...खरंच की काय..."
"अग खरंच.....मला काढून टाकल आहे....आता आत्तु...मला सांग....असं कधी कोणी करतं का? एक दिवस लिहलं नाही म्हणून काही लगेच ग्रुप अन ऍप मधून काढालं...."
"हो ना..."
"अस करतात का कधी...पण माझ्या टीचर ने केलं आहे...बघ ना..."😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
हे असं
आहे...इतकं शहाणपण फक्त स्वतःचा मुद्दा पटवायचा असतो तेव्हाच बरोबर येतो....नंतर मात्र
मी आता छान लिहीन ,रोज लिहीन वगैरे वगैरे प्रॉमिस करून आम्हाला गुंडाळल अन त्यानंतर
ये रे माझ्या मागल्या 🤣🤣😂😂
